परमार आत्महत्या प्रकरणातील नगरसेवक अडचणीत
विक्रांत चव्हाण हे काँग्रेसचा नगरसेवक असून याप्रकरणी त्यांचं घर आणि कार्यालयासह एकूण ११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत.
ठाणे : ठाण्यातील सूरज परमार आत्महत्या प्रकरणातले आरोपी विक्रांत चव्हाण विरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत चव्हाण हे काँग्रेसचा नगरसेवक असून याप्रकरणी त्यांचं घर आणि कार्यालयासह एकूण ११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत.
कुटुंबियांवरही सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल
विक्रांत चव्हाण यांच्या कुटुंबियांवरही सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विक्रांत चव्हाण यांच्यावर बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातही यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे.
११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले
विक्रांत चव्हाण हे सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील ४ आरोपींपैकी एक आहेत, सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणात आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.