दीपक भातुसे / नागपूर : हिवाळी अधिवेशान भाजप आमदार अनिल गोटे यांनी सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याने संपात व्यक्त केला. मंत्रालयातील काही सनदी अधिकारी दोन-दोन तास गायब असतात. त्यांच्या मेजवाण्या  पंचतारांकित हॉटेलमध्ये झडत असतात हे सभागृहाच्या निर्दशनाला आणून दिले.


लोक आणि आमदार ताटकळत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी आलेले लोक आणि आमदार ताटकळत असतात. मात्र, राज्यातील सनदी अधिकारी दुपारी दोन दोन तास जेवायला जातात. तर काही अधिकारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला जातात. यामध्ये ते दोन-दोन तास ते जेवणावर ताव मारत असतात. मात्र मंत्रालयात कामासाठी आलेले लोक उपाशी असतात, त्याचे त्यांना काहीही नसते, असे आमदार गोटे म्हणालेत.


सचिव मंत्रालयात नसल्याने कामांचा खोळंबा


अनेकवेळा सचिवच मंत्रालयात नसल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ातून आलेले लोकांची कामे होत नाहीत, असा थेट आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यामुळे भाजप सरकारचा अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याचे अधोरेखीत होत असल्याचे या आरोपावरुन स्पष्ट झालेतय.


अनिल गोटे यांची माहिती


- राज्यातील सनदी अधिकारी दुपारी दोन दोन तास जेवायला जातात
- काही अधिकारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला जातात
- त्यामुळे राज्यभरातून कामासाठी आलेले लोक आणि आमदार ताटकळत असतात
- मुख्यमंत्री वेळ वाचावा म्हणून घरून डबा आणतात आणि सनदी अधिकारी घरी दोन दोन तास जेवायला जातात
- अधिकाऱ्यांना ही सवलत कुणी दिली
- सचिव मंत्रालयात नसल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ातून आलेले लोकांची कामे होत नाहीत