`पबजी` गेमसाठी होणाऱ्या मेहुण्यावर चाकू हल्ला
या हल्ल्यात पीडीत गंभीर जखमी झाला असल्याचे स्थानिक पोलिसांनी माहिती दिली.
कल्याण : पहाटेच्या सुमारास पबजी गेम खेळत असताना, मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे संतापलेल्या तरुणाने होणाऱ्या मेहूण्यावरच चाकू हल्ला केला. ही घटना कल्याण पूर्व येथे घडली. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात याची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या हल्ल्यात पीडीत गंभीर जखमी झाला असल्याचे स्थानिक पोलिसांनी माहिती दिली.
ओम बावदनकर हा अंबरनाथ येथील रहिवासी आहे. ओम याचे कल्याण पूर्व काटेमानवली पावशे नगर जयमोती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न जमले होते. नेहमी प्रमाणे ओम हा त्याच्या होण्याऱ्या पत्नीच्या घरी गेला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ओमच्या होणाऱ्या पत्नीचा भाऊ रजनीश हा मोबाइलवर पबजी गेम खेळत होता. गेम खेळत असताना त्याच्या मोबाईची बॅटरी कमी झाल्यामुळे तो चार्जर शोधू लागला. जर मोबाईल चार्जिंगला नाही लावला, तर त्याला गेम अर्धवट सोडून द्यावा लागेल. या उद्देशाने रजनिश मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी धडपड करु लागला. परंतु चार्जर कुत्राने चावल्यामुळे फोनला चार्जिंग होत नव्हती. त्यामुळे रजनिश अधिकच संतापला आणि घरात वाद घालू लागला. रागाच्या भरात रजनिशने त्याच्या बहीणीच्या लॅपटॉपचे चार्जर चाकूने कापून टाकले. यामुळे ओमही रजनिशला रागात ओरडला आणि हे कृत्य थांबवण्यास सांगितले. आधिच गेम अर्धवट सोडावा लागल्यामुळे रजनिशचा पारा चढला आणि त्याने हातात असलेल्या चाकूनेच ओमवर हल्ला केला.