भांडुप मधून बेपत्ता झालेला मुलगा 15 दिवसांनी भिवंडीत दिसला; टी शर्टमुळे पटली ओळख
मंडळाच्या टी शर्ट मुळे हरवलेल्या मुलाची 15 दिवसानंतर त्याच्या आईशी भेट झाली आहे. हा मुलगा भांडुप येथून हरवला होता.
Bhandup Crime News : दंहीहंडी तसेच गणेशोत्सवात मंडळाच्या नावाचे टी शर्ट छापण्याचा ट्रेंड सध्या निघाला आहे. मात्र, मंडळाचा हा टी शर्ट छापण्याचा उपक्रम एका 12 वर्षाच्या मुलासाठी त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बनला आहे. भांडुप (Bhandup) मधून बेपत्त झालेला मुलगा 15 दिवसांनी भिवंडीत दिसला टी शर्टमुळे त्याची ओळख पटली.
दहीहंडी तसेच गणेश उत्सव काळामध्ये अनेक राजकीय पक्ष आणि मंडळाकडून कार्यकर्त्यांसाठी टी-शर्ट छापले जातात याच टी-शर्ट मुळे भांडुप मधील एका मातेला तिचा 15 दिवसांपूर्वी हरवलेला मुलगा शोधण्यास मदत झाली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भांडुप मध्ये बारा वर्षाचा मुलगा तिच्या आईपासून गर्दीमध्ये वेगळा झाला होता. या मुलाला बोलता येत नसल्यामुळे त्याला नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. त्याच्या आईने संपूर्ण परिसरात शोधाशोध केली परंतु तो सापडून न आल्यामुळे अखेर रात्री त्याच्या अपहरणाची तक्रार भांडुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या मुलाने कौशिक पाटील यांच्या मंडळाचे टी-शर्ट घातलं होते. 15 दिवसांनी भिवंडीत एका मंदिराजवळ एका व्यक्तीला हा मुलगा भांबावलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने हा मुलगा हरवला असल्याचं ओळखलं आणि त्याच्या टी-शर्ट वर पाठीमागे छापलेल्या व्यक्तींची शोध शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना भांडुप मधील स्वर्गीय दिनाबामा पाटील यांचे नातू कौशिक पाटील असल्याचं समजलं आणि त्यांनी कौशिक पाटील यांना संपर्क साधून तुमच्या परिसरातील मुलगा हा भिवंडीत सापडला असल्याची माहिती दिली कौशिक पाटील यांनी परिसरात याच्या संदर्भात माहिती घेतली असता 15 दिवसांपूर्वी एक बारा वर्षांचा मुलगा हरवला असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि या मुलाची ओळख पटवून त्याला भांडुप मध्ये आणण्यात आले. यानंतर या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं केवळ. एका टी-शर्ट वर छापलेल्या नावामुळे हा बारा वर्षाचा चिमुकला अखेर तिच्या आईपर्यंत पोहचला आहे.