अशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले
वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.
vasai tungareshwar waterfall : वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.
पुरात अडकलेली कार पोलिसांनी थरारक पद्धतीने खेचून बाहेर काढली
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आलाय. मनोर रस्ता पाण्याखाली गेलाय. या पुरात अडकलेली कार पोलिसांनी थरारक पद्धतीने खेचून बाहेर काढलीय. वाहतूक पोलिसांनी हे बचावकार्य केलं. मासवण इथे पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक कार अडकली. मात्र कारचालकाच्या मदतीला पोलीस धावून आले आणि त्यांनी ही कार खेचून बाहेर काढली.
हिंगोलीत पुराच्या पाण्यात मोटरसायकल वाहुन गेली
हिंगोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाल्यानं ओढ्या-नाल्यांना पूर आलाय. कळमनुरी तालुक्यातील एलकी येथील मंचकनगर भागातील एका ओढ्यात पुराच्या पाण्यातून मोटार सायकल टाकणं एका तरुणांच्या चांगलच अंगलट आलंय. एलकी येथील ग्रामस्थ त्या तरुणाला पुराच्या पाण्यात दुचाकी टाकू नको, असं सांगत होते. मात्र गावक-यांचं न ऐकता त्यानं बाईक पाण्यात टाकली. त्याची दुचाकी वाहून गेली आणि तो वाहून जाता जाता थोडक्यात बचावला आहे.
वर्सोवा पूलावर खड्ड्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हे दाखल
मुंबई अहमदाबाद महामार्गांवर नव्याने बनविण्यात आलेल्या वर्सोवा पूलावर उदघाटनापासून अवघ्या तीन महिन्यात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. खासदार राजेंद्र गावीत यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर दोन ठेकेदारांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 336 व 34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या तीन महिन्यात नवीन पूलावर हे खड्डे पडल्याने खासदार राजेंद्र गावीत यांनी आज दुपारी महामार्ग प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पूलावर बोलवून त्यांना रस्त्याची गुणवत्ता दाखवून संताप व्यक्त केला. रस्ता बनविताना वापरलेले पदार्थही निघाल्याने हातात घेऊन त्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इंग्रजांच्या काळापासून बनविण्यात आलेले पूल व त्यांनी केलेल्या बांधकामाचा पाढा त्यांनी अधिकाऱ्यांना वाचून दाखवला व रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या.