ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी, ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं, इक्बाल कासकर विरोधात एक हजार ६४५ पानांचे हे आरोपपत्र दाखल केले आहे. 


या आरोपपत्रात इक्बाल कासकरने खंडणीत मागितलेल्या फ्लॅटची कागदपत्रं, तसंच मोबाईलचं लोकेशन आणि इतरही पुरावे, सादर करण्यात आले आहेत. 


तर गँगस्टर छोटा शकीलसहीत इतर दोन जणांना ठाणे गुन्हे शाखेने फरार दाखवले आहे.