मुंबई : किरकोळ वादातून मुलानेच केला बापाचा खून. कोल्हापूर जवळील उचगाव इथल्या मणेर मळ्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांन कात्रीने वडिलांच्या छातीत सपासप वार केल्यामुळे बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रकांत सोनुले असं वडिलांच नाव आहे. यामध्ये  वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी जेवताना झालेल्या वादाच्या रागातून मुलगा ज्ञानेश्वर सोनुलेने हे कृत्य केलं आहे. 



करवीरचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. गांधी नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.