Maharashtra Politics : ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष संपणार? `जानी दुश्मन` पुन्हा जिगरी दोस्त बनणार?
देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलंय. तर फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : आज भी अच्छे रिलेशन है... हमारे मन में कटुता नही... मेरा दिल साफ है... हे शब्द आहेत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. ठाकरे विरुद्ध फडणवीस... उभ्या महाराष्ट्रानं हा राजकीय संघर्ष पाहिला. याच संघर्षातून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. मात्र, लवकरच ही दुश्मनी संपली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. 'जानी दुश्मन' पुन्हा जिगरी दोस्त बनणार?
सूडाच्या राजकारणानंतर सद्बुध्दीचा अध्याय महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळणार आहे.
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे हा राजकीय वाद संपमार अशी चर्चा रंगली आहे. आमच्यात वैयक्तिक दुश्मनी नाही.. असं दोघांनीही जाहीरपणं सांगितले. आता यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? कारण ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यातला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. याच संघर्षातून महाराष्ट्राच्या इतिहासात मोठमोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी केवळ वैचारिक मतभेद आहेत असं स्पष्टीकरण माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी दिलंय. तर फडणवीसांनीही याला दुजोरा दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही फडणवीसांनी व्यक्त केलीय.
फडणवीसांची सत्ता गेली, ठाकरेंची आली... शिवसेनेत मोठं बंड झालं... ठाकरेंची सत्ता गेली, पुन्हा फडणवीस सत्तेवर आले. ठाकरे विरुद्ध फडणवीस हा सामना चांगलाच गाजला. मात्र, लवकरच या सामन्याला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांच्याशी शत्रुत्व नाही वैयक्तीक मतभेद आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी दोस्तीचा हात पुढं केल्यानंतर फडणवीसही मागे राहिले नाहीत. उद्धव आणि आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं फडणवीसांनी स्पष्ट करून टाकले.
सध्या महाराष्ट्रात सूडाचं राजकारण सुरू आहे. राजकीय पक्षांमध्ये अक्षरशः पोलिटिकल गँगवॉर सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. अशा वेळी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जुळू लागलेले हे नवे सूर आशादायी म्हणावे लागतील. सूडाच्या राजकारणानंतर आता महाराष्ट्रात सद्बुद्धीचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. त्यामुळंच ठाकरे आणि फडणवीसांची पुन्हा युती झाली तर धक्का बसायला नको. कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही.