Thane To Borivali In 10 Minutes : ठाणे –बोरिवली टनेलला मंजुरी दिली आहे. येत्या काही काळात ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणं शक्य होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या ओवळा माजीवाडा मतदारसंघातील विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.


मुंबईकरांचा लोकल प्रवास वंदे मेट्रोने होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी वंदे मेट्रो सुरु करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डान घेतलाय..आता मुंबई रेल्वे विकास महामंडळांने 238 वंदे मेट्रो लोकसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत..29 सप्टेंबर 2023पर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.


कर्जत, कसारा, पनवेल, पालघर फक्त अर्ध्या तासात गाठता येणार


कर्जत, कसारा, पनवेल, पालघर फक्त अर्ध्या तासात गाठता येईल तेही मेट्रोने. महामुंबईतल्या वाहतुकीला वेग देण्यासाठी रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्थातच जलद मेट्रोची चाचपणी झाल्याचं समजते. कर्जत, कसारा, पनवेल, पालघर, ठाणे-डोंबिवली ही लांब अंतरावरची स्टेशन्स मेट्रोने जोडण्याची शक्यता आहे. 


नवी मुंबई मेट्रोचा मार्ग मोकळा


नवी मुंबई मेट्रोचा मार्ग आता मोकळा झालाय. मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र प्राप्त झालंय. त्यामुळे बेलापूर ते पेंधर दरम्यान लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. आता मात्र मेट्रोचे उद्घाटन केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार 


शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली होती.  नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटांत पार करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच ओपन डेक बसमधून, मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरुन प्रवास केला. पाहणी करताना फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग होतं आणि शिंदे फडणवीसांच्या बाजूला बसले होते. 


कोस्टल रोडचं बांधकाम मोठ्या वेगाने सुरु


मुंबईत सध्या सुरु असलेल्या कोस्टल रोडचं बांधकाम मोठ्या वेगाने सुरु आहे. यावर्षीच्या अखेरीला कोस्टल रोड पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. हाजीअली परिसरात कोस्टल रोडवर आठ बाजूनी वाहतूक होणार आहे. त्यासाठी पुलांचं जाळं उभारण्यात येत आहे.