सांगली : कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठं गाव असलेलं कुरुंदवाड संपूर्ण पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. या गावातील लोक आठवडाभर घरांच्या वरच्या मजल्यावर अडकून पडले आहेत. सात दिवसांपर्यंत या गावात मदत पोहचली नसून अजूनही दोन मजल्यापर्यंत या गावात पुराचं पाणी साचलेलंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील शेती, मंदिर आणि पेट्रोलपंप सारं काही पाण्याखाली गेलंय. नेव्हीची पहिली टीम सात दिवसांनी या गावात आता पोहचली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्यानं एनडीआरएफची एकही बोट या गावात पोहचू शकलेली नव्हती.


हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अन्नपदार्थांची पाकिटं जरी गावात पोहचवली असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.