नाशिक :  येथील लासलगाव एसटी बसस्थानकावर (Lasalgaon ST bus station) एका महिलेला रविवारी भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ६७ टक्के भाजल्यानं पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिला अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं आहे. मसीना रुग्णालयात पीडित महिलेवर पुढील उपचार होणार आहे. पहाटे तिची तब्येत अचानक खालवली त्यामुळे तिला तात्काळ मुंबईत हलवण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या लासलगाव परिसरात हिंगणघाटची पूनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. अशा सततच्या घटनेवरून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे. देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर आहे.  


येथील लासलगाव एसटी बसस्थानकावर (Lasalgaon ST bus station) 
महिलेच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत महिला ६७ टक्के भाजली असून तिला अधिक उपचारासाठी नाशिक (Nashik hospital) येथे हलविण्यात आले आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. दरम्यान, पीडित महिलेच्या (victim) जबाब घेतला असून त्यानुसार तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अजून मिळालेला नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.  


महिलेच्या जबाबानुसार तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सापडलेला नाही. दरम्यान, महिलेने आपल्या गाडीतून पेट्रोल बाहेर काढले होते. तर मुख्य आरोपीने पीडित महिलेशी २२ जानेवारीला लग्न केले होते. ते तिच्या घरच्यांना मान्य नसल्याची माहिती आहे.