LAST LETTER OF CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ : - नागपुरात 108 वे इंडियन सायन्स काँग्रेस च्या वतीने प्रदर्शन ठेवलं होत. प्रदर्शनात अनेक विषयांवर संशोधन साहित्यासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्तलिखित शेवटचं पत्र आणि अनेक साहित्य उपलब्ध आहेत. पाहणाऱ्यांची आणि शिवप्रेमींसाठी ही जणू पर्वणीच आहे. नागपूरच्या रीसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशने (Research For Resurgence Foundation, Nagpur) हा ऐतिहासिक ठेवा जपला असून याच डिजिटलायझेशन (digitalisation) करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच बीड जिल्ह्यातील मंजरथ येथील रामचंद्र दीक्षित यांचं हस्तलिखितं आहेत ज्यात अनेक महत्वाची माहिती मिळते, यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माची निश्चितच तारीख (birth date of chatrapati shivaji maharaj) मिळते, शिवाय रामदास स्वामी (ramdas swami) यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना राम मंत्राची दीक्षा दिल्याचासुद्धा यात उल्लेख आहे. (hand written letter of chatrapati shivaji maharaj revealed)


छत्रपती शिवाजी महाराज यांचं रामचंद्र दीक्षित यांनी लिहिलेलं पहिलं हस्तलिखित आणि महाराजांनी स्वतः लिहिलेलं त्यांच्या आयुष्यातील शेवटचं पत्र याठिकाणी पाहायला मिळत आहे.  



संबंधित पत्रात असा मजकूर आहे की, ''स्वराजाची चाकरी करणाऱ्या कुटुंबाकडे जीवन जगण्यासाठी शेती हा एकमेव पर्याय असल्यानं त्यांचं वतन कायम ठेवू'' . हैद्राबाद येथील एक कुटुंबाकडून हे पत्र  मिळाले आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी हे पत्र अगदी जपून ठेवलं आहे. शिवाय अनेक ग्रंथांचं  डिजीटलायझेशनसुद्धा त्यांनी केलं आहे. 


रामदास स्वामींना महाराजांनी लिहिलेल्या पत्राची मूळ प्रत सुद्धा सापडली आहे 


श्रीसदगुरुवर्य... सकळतीर्थरुप.... श्रीकैवल्यधाम... श्रीमहाराज.... श्रीस्वामी....स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजी राजे मस्तक ठेऊनी विज्ञापनाजे.... अशा मायन्यानं सुरु झालेलं छत्रपती शिवाजी महाराजाचं हे पत्र समर्थ रामदास स्वामींना पाठवण्यात आलंय.


1678 साली महाराजांनी एक विस्तृत सनद लिहून तब्बल 33 गावं समर्थांना इनाम म्हणून दिली होती. या सनदेचीच फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनविलेली प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी लंडनमधे आढळली.



या सनदेचं एक छायाचित्र  नुकतचं पुण्यात प्रकाशित करण्यात आलं. या पत्रावरचं हस्ताक्षर, महाराजांची राजमुद्रा, स्वाक्ष-या हे सगळं काही आजवर शिवाजी महाराजांच्या सापडलेल्या दस्तावेजांशी मिळतं जुळतं असल्याचं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे.
1906 साली देखील या पत्राची एक नक्कल हाती लागली होती. मात्र हे मूळ पत्र कोणाच्याही पाहण्यात आले नव्हते. कौस्तुभ कस्तुरे, शिवराम कार्लेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून या मूळ पत्राची प्रत पुण्यात आणण्यात आलीय.