रत्नागिरी  : खेड येथील जगबुडी नदीला पूर आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे खेड येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, सकाळी महाड येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती. उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, येथून एकेरी वाहतूक सुरु आहे. तर दुसरीकडे रोह्यात कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी बंद पडल्यानं रेल्वे रेल्वे मार्गही ठप्प आहे. त्यामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीचा पूल धोकादायक झालाय. मुसळधार पाऊस कोसळत असून नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळी वाढ होत आहे. पूरस्थिती असून पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस तैनात करण्यात आले आहे. सध्या पुलावरून जाणारी वाहतूक पोलिसांनी केली बंद केली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.



जगबुडी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली असून दापोली-खेड मार्गावर पाणी आल्याने या मार्गाची वाहतूक ही संथ गतीने सुरु आहे तर खेड बाजापरपेठेतही पाणी शिरले आहे. तर चिपळूणमध्येही अशीच परिस्थिती आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर चिपळूण आणि खेडमध्ये पुराचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.


मुंबई - रायगड  महामार्गावर पेण जवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. त्यामुळं या महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या  रांगा लागल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे आणि मुंबईकडे येणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.