नवी मुंबई : सानपाड्यामध्ये होळीच्या दिवशी एका मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. संध्याकाळी सातच्या दरम्यानची ही घटना. पण साडेनऊच्या सुमाराला मुलगी स्वत:हून घरी परतली.  पण या सगळ्या प्रकारानंतर रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पामबीचरोडवर काही काळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यामुळं वाहतूक कोंडी झाली होती. सानपाड्यातल्या १५ वर्षीय मुलीचं शुक्रवारी संध्याकाळी अपहरण झालं.  पांढ-या रंगाच्या ओमनीमधून आलेल्या तरुणांनी तिला पळवून नेलं. शोधाशोध सुरू झाली.  मात्र रात्री साडे नऊच्या सुमाराला मुलगी सुखरुप घरी परतली.



आपल्याला वाशीच्या रस्त्यावर टाकून आरोपी पळून गेल्याची माहिती मुलीनं दिलीय. तिला कोणतीही इजा झालेली नाही.  दरम्यान सानपाडा पोलीस आणि नवी मुंबई क्राईम ब्रँन्च वाशीत रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.