मुंबई : कुणाच्याही घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते. हा नवा पायंडा योग्य नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी काँग्रेसला सुनावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठल्याही राजकीय पक्षाने असे करू नये. यामुळे प्रशासन आणि पोलिसांवर ताण येतो. सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. आंदोलन करण्यासाठी जी जागा ठरवून दिली आहे तिथेच आंदोलन केले पाहिजे. कोणत्याही नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं.


बोराडे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष नाहीत.
परभणीतील २ नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले हे खरं आहे. परंतु, सेलूचे नगराध्यक्ष बोराडे हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेले हा दावा खोटा आहे. ते अशोक चव्हाण यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. स्थानिक आघाडी करून ते निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्ष सोडून गेले हे बोलणे बरोबर नाही, असे मलिक म्हणाले.


मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटीचे घोटाळे
दोन दिवसांपूर्वी २३ हजार कोटींची बँक घोटाळा उघडकीस आला. २०१५ साली याची तक्रार होऊनही सीबीआयने इतकी वर्ष झाली तरी गुन्हा दाखल केला गेला नाही. सीबीआयने याबाबत अतिशय संथगतीने काम केले. मोदींच्या काळात साडे पाच लाख कोटीचे घोटाळे झाले. घोटाळे करणारे परदेशात लपून बसलेत आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी केला.