Maharashtra Vidhan Sabha MLA :महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. 2026 मध्ये आमदारांची संख्या 288 वरून थेट 360वर जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या विधानसभेत 300 आमदारांना बसण्याची जागा आहे. त्यामुळे वाढीव आमदारांसाठी नवं विधान भवन उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 


विधानसभा अध्यक्षांनी दिले होते महाराष्ट्राला नवं विधान भवन मिळणार असल्याचे संकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या संसद भवनासारखंच लवकरच राज्यालाही नवं विधान भवन मिळणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. विधान भवनाची नवी वास्तू उभारण्याचं सरकारच्या विचाराधीन असल्याचं जे जे स्कूल ऑफ आर्टच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं. 


विधानभवन पार्किंग जागेतच नवं विधानभवन बांधण्याचं नियोजन 


सध्याच्या विधानभवन पार्किंग जागेतच नवं विधानभवन बांधण्याचं नियोजन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यासंबंधी लवकरच प्रस्ताव देणार आहेत. तसंच आमदारांची आसन व्यवस्था वाढवण्याचाही विचार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. 


असं आहे नविन संसद भवन 


लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी नव्या संसद भवानासाठी केंद्र सरकारकडे आग्रह केला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. चार मजल्यांच्या या इमारतीत 1224 खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं मंदिर आणि देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब आहे. आता असलेल्या जुन्या संसद भवनपेक्षा नवं संसद भवन तब्बल 1700 चौरस मीटर मोठे आहे. एकूण 64,500 चौरस मीटर जागेत ही इमारत उभारण्यात आली आहे. नव्या संसद भवनात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 
जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि  संसद भवन या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतीक आहे. ही वास्तू ब्रिटीशांच्या काळात उभी राहिली. इंग्रजांनी जनतेच्या प्रतिनिधित्वासाठी हे संसद भवन बांधलं. नवी दिल्लीच्या आराखड्याचं श्रेय जातं ते एडविन लुंटियंस यांना. राष्ट्रपतिभवनाला आधी गव्हर्नर हाऊस म्हटलं जायचं. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या दोन वास्तूंमध्ये एकही इमारत नाही. 
संसद भवन १४४ स्तंभांच्या आधारावर दिमाखात उभं आहे. प्रत्येक स्तंभाची उंची 27 फूट आहे.. संसद भवनाच्या वास्तूरचनेचं श्रेय जातं  एडविन लुटियंस आणि सर हर्बर्ट बेकर यांना. त्यावेळी ही संपूर्ण वास्तू फक्त 83 लाखांमध्ये बांधून पूर्ण झाली होती. या संसद भवनाचं बांधकाम सुरू झालं 12 फेब्रुवारी 1921 ला. ही वास्तू तयार होण्यासाठी सहा वर्षं लागली.  संसद भवन आता 92 वर्षांचं आहे.