रत्नागिरी : भाट्ये समुद्र किनाऱ्यावर विचित्र असा मासा आढळून आला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मंडळींना हा मासा दिसला. या माशाचे डोळे मोठे तर त्याच्या शरीरावर काटे होते. त्यामुळे या माशाला पाहण्यासाी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मासा केंड माश्याच्या प्रजातीतील आहे. या प्रजातीचे अनेक मासे समुद्रात दिसून येतात. केंड प्रजातीतील मासे मच्छिमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान करतात. त्यांच्या दातांची रचना अन्य माश्यापेक्षा वेगळी असते. अशा पद्धतीने किनाऱ्यावर येत नाहीत. त्याचे शास्त्रीय नाव पॉर्क्युपाईन पफर फिश असे असले तरी तो ब्लो फिश ग्लोब फिश अशा विविध नावानी ओळखला जातो. 


त्याच्यावर जेव्हा संकट येते तेव्हा तो आपल्या शरीराचा आकार फुग्या सारखा करतो आणि स्वतःचं संरक्षण करतो.  जपानमध्ये या माशाला 'फुगू फिश' या नावाने ओळखले जाते. हा मासा विषारी असला तरी जपानमध्ये मात्र तो खाल्ला जातो. मात्र तो तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना परवाना दिला जातो.


हा मासा खाल्याने जपानमध्ये दरवर्षी किमान १०० लोकांचा मृत्यू होतो अशी माहिती काही तज्ज्ञांनी दिलीय. माशाच्या शरीरावरील न्यूरोटॉक्सिन हे सायनाइडपेक्षा १२०० पटीने जहाल असल्याचे यावेळी सांगितले.