अमरावती : अमरावती ( Amravati ) शहरालगत असलेल्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये ( Valgaon Police Station ) कार्यरत कर्मचारी विजय अडोकर ( PSI Vijay Adokar ) यांना पॅरॅलिसिसचा आजार होता. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून ते रजेवर होते. या आजारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी कामावर बोलावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय अडोकार हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत होते. त्यांना पॅरॅलिसिसचा ( Paralysis ) आजार होता. त्यामुळे त्यांनी दोन महिने सुट्टी टाकली होती. परंतु, कामावर रुजू होण्यासाठी त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी नोटीस पाठविली होती.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या जाचाला कंटाळून आज सकाळी विजय अडोकर यांनी आपल्या घराजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या वडिलांनी बदलीसाठी वारंवार अर्ज केला होता. मात्र, अर्ज करूनही त्यांची बदली केली नाही. तसेच, पोलीस आयुक्त आरती सिंग ( comissinor arti singh ) यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप त्यांची मुलगी अंकिता हिने केला.


दरम्यान, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका कुटुंबाने घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय आडकर यांनी केलेल्या आत्महत्येमुळे पोलिस दलात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.