2024 नंतर चित्र वेगळे असेल; संजय राऊत यांचा इशारा
राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. नबाव मलिक यांच्या समर्थनात शिवसेनेचे संजय राऊत पुढे सरसावले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. नबाव मलिक यांच्या समर्थनात शिवसेनेचे संजय राऊत पुढे सरसावले आहेत. भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? असा सवाल त्यांनी केलाय.
नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने सत्य बोलतोय. जे सत्य बोलतात किंवा भाजपचे जिथे सरकार नाहीय तिथे ईडी, सीबीआय अशा तपास यंत्रणा मागे लावल्या जात आहेत. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले. मलिक कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते सत्य बोलताहेत म्हणूनच त्यांना चौकशीसाठी नेले आहे, असे राऊत म्हणाले.
किरीट सोमय्यांनी हे प्रकरण ईडीकडे दिलं आहे. त्याचप्रमाणे आम्हीही भाजपा नेत्यांची सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. पाहू काय कारवाई होते. पण लक्षात ठेवा. 2024 नंतर चित्र वेगळे असेल. 2024 नंतर आम्हीसुध्दा तुमच्या मागे अशाच तपास यंत्रणा लावू असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच, मलिक यांची चौकशी होईल आणि ते संध्याकाळी घरी येतील, असा दावाही त्यांनी केला.