औरंगाबाद : राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील आरोग्य विभागाला सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आले होते. त्यावेळी त्यांनी दुसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हवामानात बदल झाला आहे. थंडीचा हंगाम असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आपण काळजी घेण्याची आवश्यता आहे. राज्यात कोरोनाची रुग्णांची कमी झालेली आहे. जवळपास ८० टक्के बेड रिकामी आहेत. त्यानुसार आढवा घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात सांगण्यात आले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.



  कोरोना जागतिक महामारीमध्ये देशात महाराष्ट्र राज्याने मोठ्या संख्येने असतानाही आपण या परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यास यशस्वी ठरलो आहोत. मात्र आपल्याला गाफील राहून चालणार नाही, राजेश टोपे म्हणाले. 


राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे औरंगाबाद आरोग्य विभाग सुद्धा कामाला लागले आहेत. सरकारी हॉस्पिटल्स आणि खासगी हॉस्पिटल्स सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नक्की दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाची तयारी सुरु झालेली आहे.


मनपा आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी याबाबत माहिती दिली. औरंगाबादेत सध्या ८०० वर आयसीयू बेड आहेत. क्वारंटाईनसाठी ५०००च्यावर बेडची सोय आहे. तर २००० च्यावर ऑक्सिजन बेड आहेत. २०० पेक्षा जास्त व्हेंटिलेटरची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.