मुंबई : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) परराज्यात गेलेले स्थलांतरित मजूर (Migrant Worker) परतल्यावर त्यांची नोंद करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक मजूर परतले पण त्यांची नोंद झाली नाही. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर मजूर पुन्हा एकदा आपल्या गावी गेलेयत. दरम्यान या मजुरांची नोंद ठेवावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) काल झालेल्या बैठकीत दिलेयत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजुरांची नोंदणी करण्याची राज ठाकरे यांची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार आहे. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी ही सूचना केली होती, मात्र त्याकडे राजकारण म्हणून पाहिलं गेलं. आता कोरोना वाढल्यावर सरकारला हे पुन्हा सुचलं हे चांगलं आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय. 
 
आता मजूर, कामगार यांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी काटेकोरपणे केली गेली पाहिजे. राज्यातील अनेक भागातून परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात गेले आहेत. हे मजूर परत येथील तेव्हा त्याची सर्व जिल्ह्यात नोंदणी करा



काय म्हणाले मुख्यमंत्री ?


गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


उद्योगांशी संपर्क ठेवा 


कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केलीआहे का  ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.