औरंगाबाद : मधील भाजपा खासदार डॉ भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराडने पक्षाच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारल्याची घटना शनिवारी रात्री १०च्या सुमारास घडली. कोटला कॉलनीतील रहिवासी आणि भाजपा पक्षाचा कार्यकर्ता कुणाल मराठेला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन कराड, वरूण कराड, आणि पवन सोनावणे अशी  तीन अरोपींची नावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ही मारहाण कटोला कॉलनी वार्डाच्या मनपा निवडणुकीतील जागेच्या वादावरून झाली आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी कुणाल मराठे आणि खा. कराड यांचे  पुत्र हर्षवर्धन कराड दोघेही इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात जागेवरून वाद होत असल्याचे कळत आहे. 


अखेर शनिवारी या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. हर्षवर्धन कराड, वरूण कराड, आणि पवन सोनवणे या तिघांनी कुणालच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ करत जबर मारहाण केली. मनपा निवडणुकीत मला उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे तू लोकांची मदत करू नकोस असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान नातेवाईकांनी आरडाओरड केल्यामुळे त्या तिघांना तेथून पळ काढला. 


घडल्या प्रकरणाबाबत खासदार डॉ भागवत कराड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या हल्ल्याचा माझ्या मुलाशी काही संबंध नाही. हा वाद पवन सोनावणे आणि कुणाल मराठे यांच्यातील आहे. त्यामुळे हर्षवर्धन कराड, वरूण कराड, आणि पवन सोनावणे यांच्या कुणालला समजवण्याचा प्रयत्न केला. पण चर्चेतून वाद वाढल्याचं स्पष्टीकरण कराड यांनी दिलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.