Pune Crime News : प्रेम करण्याची एका तरुणाला भयानक शिक्षा मिळाली आहे. पुण्यात समलैंगिक संबधातून एका तरुणाची हत्या झाली आहे. या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. 
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. जखमी अवस्थेत त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 


आरोपी बद्दल माहिती देत असतानाच बेशुद्ध झाला


मृत तरुण हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये तो राहत होता. त्याने त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या साक्षीदारास, ज्याने त्याला मारले त्या आरोपीचे नाव आणि सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. तपासा दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या तरुणाची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचे पूर्ण सविस्तर वर्णन मिळवण्यात आले असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी आणखी एकाला अटक


ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एकाला अटक केलीय. येरवडा जेलचा कौन्सिलर सुधाकर इंगळे याला पोलिसांनी अटक केलीय.  इंगळे हा ललित पाटीलच्या संपर्कात होता. येरवडा जेलमधील पोलीस शिपाई मोईस शेख आणि ससून हॉस्पिटलमधील शिपाई महेंद्र शेवते यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर इंगळेवरही कारवाई करण्यात आलीय. 


रस्त्यावरच्या कुत्र्याला एयरगनचा छरा मारला


पुण्यात हडपसर भागात रस्त्यावरच्या कुत्र्याला एयरगनचा छरा मारल्याची घटना घडली. यात कुत्रा जखमी झाला. झेड कॉर्नर,मांजरी बुद्रुक इथे ही घटना घडली. कुत्रा त्रास देत असल्याच्या रागावरून हे कृत्य करण्यात आलं. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अली रियाज थावेरला ताब्यात घेतलं.