coronavirus : देशात कोरोनाचा धोका वाढतोय; पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचल्याने चिंता वाढली
Coronavirus Updates : देशा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे.
Coronavirus Updates : देशाचा राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 542 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू आहे. कोरोना रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आले. देशात 24 तासात कोरोनाचे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. सक्रीय रुग्णसंख्या 31हजारावर पोहचली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5.63 टक्क्यांवर पोहचल्याने चिंता वाढली आहे (Coronavirus Updates).
मुंबईत कोरोनाचा धोका वाढत आहे. 1,367 सक्रीय रुग्ण, तर, सहा हजाराहून अधिक नागरिक गृहविलगीकरणात आहे. 92 टक्के रुग्ण लक्षणंविरहीत आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 4360 कोरोनाचे ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका आहे.
मुंबईसह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्य़ाने वाढतेय
मुंबईसह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढायला लागली आहे. सध्या मुंबईत शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. याशिवाय शहरात 1 हजार 367 सक्रीय रूग्णांपैकी 92 टक्के रूग्णांना लक्षणं नाहीत. सध्या मुंबईत पाच रूग्णांची स्थिती गंभीर आहे. राज्यात सध्या 4 हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात पुन्हा कोरोनाचा कहर
देशात पुन्हा कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या नव्या 6 हजार 155 रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. हे आकडे मात्र चिंतेत भर टाकणारे आहेत. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 31 हजारांवर पोहोचली आहे. सध्या दररोजचा पॉझिटिव्हीटी दर हा 5.63 टक्क्यांवर आहे. कोरोना नियम पाळा आणि संसर्ग टाळा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकार अलर्ट मोडवर
देशात एकीकडे कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यांसाठी निर्देश जारी केले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार केरळ, महाराष्ट्र, दिल्लीत या राज्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. पॉझिटीव्ह सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणात पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांहून अधिक आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारी घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.