मुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या टोलची मुदत संपली आहे : नितीन गडकरी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलची मुदत संपली आहे. त्यामुळे टोलवसुली बंद व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही भूमिका मांडली.
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलची मुदत संपली आहे. त्यामुळे टोलवसुली बंद व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही भूमिका मांडली.
टोलवसुली बंद व्हायला पाहिजे
जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १५ व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन पुण्यात झालं. त्यावेळी मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ही भूमिका मांडली. या रस्त्याची टोलवसुली संपलेली आहे. मात्र देखभाल आणि चार पदरी, सहा पदरीकरणाच्या नावाखाली टोल घेतला जात आहे. असे असले तरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची टोलवसुली बंद व्हायला पाहिजे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गडकरींची प्रगट मुलाखत
शोध मराठी मनाचा’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांधकाम उद्योजक विजय जोशी यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. या उद्घाटन समारंभानंतर संमेलनात नितीन गडकरी यांची प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि रेणुका देशकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात त्यांनी अनेक मुद्यांवर परखड मत मांडलं आणि आठवणीही जागवल्या.
डीएसकेंची पाठराखण
दरम्यान, डीएसके यांच्यावर भाष्य केले. एखाद्या बिल्डरनं पैसे दिले नसतील तर घाबरुन जाऊ नका. तो संकटात सापडला असेल त्याच्या पाठिशी उभे रहा. तुमचे पैसे दोन वर्षांत परत मिळतील. वटवट करणाऱ्यांची आपल्याकडे कमी नाही. त्याची तमा बाळगू नका, अशा शब्दात नाव न घेता नितीन गडकरींनी डीएसकेंची पाठराखण केली.