मुंबई : मुंबई नगरी आज मराठा समाजाच्या मोर्च्याने भारून गेली.  यानिमित्ताने अभुतपूर्व जनसमुदाय मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचा ५८ वा मुक महामोर्चा मुंबईत दाखल झाला.  मराठा आंदोलनकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मागण्या सर्वांसमोर मांडताना दिसले.  तीन वर्षाची एक चिमुरडी भाषणातून आपल्या भावना सांगत होती, काही शालेय विद्यार्थी हातात फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते, कोणी सायकलवरुन मोर्चात सहभागी झाले होते, कोणी उलट्या दिशेने गाडी चालत मुंबईत आले होते. अशा विविध प्रकारे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवताना मराठा समाज दिसत होता.


औरंगाबादमधून आलेल्या तरुणांनी आपले संपूर्ण शरीर रंगवून त्यावर आपल्या मागण्या लिहिल्या होत्या.


https://www.facebook.com/Zee24Taas/videos/1646522335372145/


तसेच मोर्चाच्या सुरुवातीला त्यांनी एक मशाल पेटविली.  ही मशाल आम्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत तेवत ठेवू असे योगेशराजे अवतडे यांनी सांगितले. औरंगाबाद येथील संभाजीनगरमधील हरसुळ गावातील युवा संघटनेतील हे तरुण होते. महामोर्चाच्या आदल्यारात्री हे २९ जण मुंबईत दाखल झाले होते. मोर्चामध्ये सर्वांचे लक्ष या तरुणांनी वेधून घेतले होते.