पुणे : शहरातील पाणीकपात टळली आहे. पुण्यात जून अखेरपर्यंत पाणीकपात केली जाणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. सध्या शहरात संभाव्य पाणीकपातीची चर्चा सुरु आहे. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून होते. पुण्यामध्ये सध्या आहे तसा आणि तितकाच पाणीपुरवठा होणार असल्याचे बापट यांनी सांगितले. गरज भासली तर धरणांतील मृत पाणी साठाही वापरणार असल्याचे पालकमंत्री बापट म्हणालेत.