Bhushi Dam : भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये 10 जण अडकले.  अख्ख कुटुंब डोळ्यादेखत वाहून गेलं... पर्यटनासाठी पुण्यातून लोणावळ्याला आलेलं कुटुंब भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडालं. यात लहान मुलांचाही समावेश आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दहाजण अडकले


साहिस्ता लियाकत अन्सारी वय- 36, अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- 13, उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय- 8 वर्षे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहेत. तर अदनान अन्सारी वय- 4 वर्षे, मारिया अन्सारी वय- 9 वर्षे या दोघांचा शोध सुरू आहे. तीन जणांचा मृतदेह मिळाला असून दोन जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दहाजण अडकले, पैकी 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्या कुटुंबातील लहान मुलीला पाण्याबाहेर काढलं, पर्यटक डॉक्टरने सीपीआर देऊन जीवनदान दिलं. 


आज त्याच स्पॉटवर पाण्याचा प्रवाह अगदी साधारण


आज त्याच स्पॉटवर पाण्याचा प्रवाह अगदी साधारण दिसून येतो. मात्र रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हे चित्र वेगळं होतं. अन्सारी कुटुंब धबधब्यात पाणी कमी असताना खडकावर उभे राहिले. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक एवढा वाढला की ते संपूर्ण कुटुंब तिथेच अडकून पडलं. काही क्षणात पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं... 


काही तरुणांनी झाडाची फांदी तोडून ती फेकण्याचा प्रयत्न केला. पकडून ठेवा असं सफेद शर्टातला एक मुलगा ओरडून त्या कुटुंबाला सांगतो. धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टीकू शकले नाहीत. त्यामुळे सगळेजण वाहून गेले...यात पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, 5 जण वाहून गेले.


बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेलं


धक्कादायक बाब म्हणजे बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेले. लोणावळ्यात किंवा इतरही पर्यटन स्थळांवर सावधानता बाळगा असा इशारा दिलेला असतो. मात्र, तरीही पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं वारंवार दिसून आलंय. जर अन्सारी कुटुंबियांनीही याचं पालन केलं असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.


भुशी डॅम दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलीय.. त्यानुसार आता पर्यटनस्थळांसाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश जारी केले आहेत.  धोकादायक पर्यटन स्थळांचा सर्व जिल्हाधिका-यांना आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचे तसेच  पर्यटन स्थळांवर जीवन रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  रुग्णवाहिका ठेवा तसंच एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.