Countdown to 2024:  नवीन वर्षाचं स्वागत करताय तर जरा जपून... कारण स्वागताच्या नावाखाली धिंगाणा घातलात तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते... मुंबई आणि ठाणे पोलिसांनी तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केलाय.. मुंबईत 12 हजार तर ठाण्यात 5 हजार पोलीस तैनात असणार आहे.. 31 डिसेंबरला पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दारु पिऊन गाडी चालवणा-यांवर कारवाई केली जाणार आहे.. तसंच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणे, महिला किंवा मुलींची छेड काढणे, अंमली पदार्थाचं सेवन करणे, सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे असे प्रकार करणा-यांची कोणतीही गय केली जाणार नाही. ठाणे पोलिसांनी खासकरुन येऊरमध्ये विशेष लक्ष ठेवलंय.. रेव्ह पार्टी करणा-यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.


भाविकांसाठी शिर्डीत बंधन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीत जर तुम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण भाविकांसाठी शिर्डीत बंधन लावण्यात आली आहेत..  शिर्डीत साई मंदिराच्या परिसरात आजपासून नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आलाय.. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत होणारी साईभक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... 2 जानेवारीपर्यंत या भागात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असेल.. तसंच भाविकांच्या सुरक्षेसाठी साईनगरीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये.. दुसरीकडे शिर्डीत तुम्हाला साईंच्या मंदिरात मास्क घालून जाणं बंधनकारक असेल. भाविकांनी दर्शनाला येताना मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन करण्यात आलंय. 


थर्टी फर्स्ट च्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त


सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागतासाठी एकीकडे सर्वत्रच जय्यत तयारी सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोंदिया पोलीस सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या सालेकसा तालुक्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी या ठिकाणी करण्यात येत आहे. तर मद्यप्राशन करून वाहन चालविण्यावर पोलिसांनी कारवाई देखील केली आहे.