मुंबई : महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केलंय. या परिपत्रकाद्वारे थकीत वीज बिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळात भरघोस आलेल्या वीज बिलांमध्ये राज्य सरकार सवलत देण्याची शक्यता मावळल्याचे दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणने दिलेली बिलं कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजवून सांगावे अशी महावितरणची आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केलीय. त्यामुळे आता प्रत्येक ग्राहकांच्या जागेवर जाऊन मीटर वाचन, वीज बिल छपाई आणि वीज बिल वाटप सुरू होणार आहे. 


वीज बिल वसुलीसाठी मेळावे घेण्याचीही सूचना देण्यात आलीय. वीज ग्राहकांना टप्या टप्याने वीज बिल भरण्याची सुविधा देण्यात आलीय. यानुसार एकाच वेळी तोडगा काढून वीज बिल ग्राहक भरू शकतील. थकबाकी वसुलीसाठी जनजागृती करावी असे देखील यात म्हटलंय. 



महावितरणने पुढे एकूण ७ हजार १५४ कोटींची थकबाकी वसुलीचे उद्धिष्ट ठेवलंय. त्यामुळे आधीच कोरोनाचं संकट त्यात वीजबीलाचा फटका बसलेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल का ? हा प्रश्न कायम राहीलाय.