योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पावसाळ्याच्या दिवसात डोंगरकुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्मही उपयुक्त असतात. अशा रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने जव्हारमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भाज्या आहेत माड, कार्टुले, चावा वेल, टेरा, शेऊल, लोथीसारख्या पन्नासहुन अधिक रानभाज्या प्रकारातील, नक्कीच हि नावे तुम्ही फार कमी ऐकली असतील...मात्र या सराव भाज्या १०० टक्के नैसर्गिक औषधी आणि पोषणमूल्यांनी भरपूर आहेत.


नैसर्गिकरित्या उगवून येणाऱ्या रानभाज्यांमध्ये विलक्षण औषधी गुणधर्म असतात. आदिवासी बांधवांना त्याची माहिती परंपरेने प्राप्त होते. भारंगा ही भाजी हंगामात एक दोन वेळा खाल्ली तरी वर्षभर पोटाचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते. रानकेळी खोकल्याच्या विकारावर उपयुक्त आहेत. सह्यद्री परिसरातील डोंगरपाडा या दुर्गम गावात या महिलांनी हे सर्व मेनू केले आहेत. 


या भाज्या कुठे मिळतात, कसे खातात याच ज्ञान तेथील समाजाला परंपरेनी मिळत असत. या रानभाज्या जास्तकरून पावसाळ्यात येतात. त्यामुळे इतर भाजीपाला उपलब्ध नसताना त्या महत्वाचा अन्नस्त्रोतही ठरतात. 


आदिवासी समाजाकडे असलेले निसर्गाचे देणं शहरी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आदिवासी समाजाला काही प्रमाणात तरी अर्थप्राप्ती व्हावी या उद्देशाने हां महोत्सव आयोजित करण्यात आला.


आपल्याकडील दर्याखोर्यात न्युट्रीशनल पावडर , वनस्पती आणी गोळ्याच्या माध्यमातून हा ठेवा देऊन लाखो रुपयाना नागरिकांना गंडविन्यात येत आहे.  श्रावणातील हे ओर्गानिक मेनू जपण्यासाठी प्रत्येक शहरातील सधन कुटुंबीयांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.