मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने अखेर सरकारने आज काही महत्त्वाचे निर्बंध राज्यात लागू केले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नियमांचं पालन करण्याच आवाहन यावेळी नागरिकांना केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलून, चित्रपटगृहे बंद


राज्यात लागू केलेल्या नव्या निर्बंधानुसार मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहणार आहेत. तसेच चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क हे देखील पूर्णपणे बंद राहणार आहेत. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. 


प्रार्थना स्थळे दर्शनासाठी बंद


राज्यात सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त आणि दर्शनार्थीसाठी बंद राहणार आहे. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि पुजारी येथे दैनंदिन पूजा अर्चा करु शकतील. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.


हॉटेल आणि बार बंद


राज्यातील उपाहारगृहे तसेच बार पूर्णतः बंद राहणार आहेत. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, पण बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवता येणार आहे.


खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा


रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करु शकतील.


शाळा-महाविद्यालये बंद


राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा अपवाद असतील. तसेच सर्व खासगी क्लासेस बंद राहतील. 


संबंधित बातमी: महाराष्ट्रात विकेंन्ड लॉकडाउन, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम