Trending News In Marathi: सध्या संपूर्ण देशभरात भयंकर उकाडा आहे. देशात उष्णतेची लाट पसरली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याचा फटका चोरांनाही बसला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एक घरात चोरीची अनोखी घटना घडली आहे. चोरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला मात्र, तो चोरी करायलाच विसरला. या प्रकरणानंतर पोलिसांनीही डोक्यावर हात मारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरी चोरी करण्यासाठी घरात तर घुसला मात्र, उकाड्याने तो इतका हैराण झाला होता की खोलीत असलेल्या एसीच्या थंड हवेमुळं तो चोरी करायलाच विसरला आणि त्याला झोप लागली. त्यानंतर चोर एसीच्या हवेत गाढ झोपला जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इंदिरानगर येथील सेक्टर 20मधील ही घटना आहे. इंदिरानगर परिसरात डॉक्टर सुनील पांडे नावाचे एक व्यक्ती राहतात. जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांच्या घरात कोणीच नव्हते. सुनील पांडे वाराणसी येथे प्रॅक्टिस करतात. 


सुनील पांडे घरात नसताना चोर चोरी करण्यासाठी घरी आला. घरात घुसल्यानंतर तो हॉलमध्ये पोहोचला. तेव्हा त्याचे लक्ष हॉलमध्ये असलेल्या एसीकडे गेले. तेव्हा चोराने एसी लावला आणि तिथेच जमिनीवर झोपला. त्याला इतकी गाढ झोप लागली की त्याला कळलंच नाही की तो चोरी करण्यासाठी आला होता. शेजाऱ्यांना घराचा गेट खुला दिसला तेव्हा घराच्या मालकांनी डॉक्टर सुनील यांना फोन केला. या फोननंतर डॉक्टरांनी पोलिसांना याघटनेबाबत माहिती दिली. 


सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. घरात पोहोचतान त्यांना चोर घरात एसीमध्ये झोपलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उठवून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. डीसीपी नॉर्थ झोन आर. विजय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. मात्र, तिथे एसीच्या थंड हवेमुळं तो तिथेच झोपला. त्याचवेळी तो नशेतदेखील होता. त्यामुळं तो घरातच झोपून राहिला. शेजाऱ्यांचे लक्ष असल्यामुळं त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही चोराला अटक करण्यात यश आलं आहे.