चोरांच्या टोळीने ४४ मोबाईल चोरले, तिघे गजाआड
४३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
पुणे : मोबाईल शॉपमधून मोबाईल चोरी करून ते पुण्यात विकणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून तब्बल ४३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नंदू परदेशी आत्राम हा मुख्य संशयित आहे. त्याने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल दुकानातून ४ ऑक्टोबरला ४४ मोबाईलची चोरी करून पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरमध्ये राहणा-या मोबाईल विक्रेता नागेश बापूं मेमाणेला दिले होते.
नागेशने या मोबाईलची परस्पर विक्री केली होती. ज्या ग्राहकांना मोबाईल विकले त्यांचा माग काढला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मुख्य सूत्रधार नंदू आत्रामसह नाशिकमधील सागर आंबेकर आणि नागेश मेमाणे या तिघांना ताब्यात घेतले आहे.