प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : अथांग आणि शांत... नजरेच्या टप्प्यात न येणारा... त्याच्या पोटात दडलंय काय... त्याची मानवाला नेहमीच उत्सुकता... हीच उत्सुकता त्या निळाईकडे खेचते... समुद्र मानवाला नेहमीच खुणावत आलाय... त्यामुळेच या महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलंय? हे बघण्याची नेहमीच उत्सुकता असते... हीच उत्सुकता माणसाला या निळाईकडे खेचून आणते.... आणि समुद्राच्या पोटातला हा अद्भुत नजारा खुला होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्राच्या पोटातली ही अदभुत दुनिया तारकर्लीप्रमाणेच रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावरही अनुभवता येणार आहे. 'हर्षा स्कुबा डायव्हिंग'नं हा प्रयोग सुरू केलाय. समुद्रातले रंगीबेरंगी मासे, पाणवनस्पती.... आणि बरंच काही..... 


समुद्राच्या पोटात गेल्यावर निसर्गाने कोकणाला किती भरभरून दिलंय, याचा हा खरा पुरावा आहे. रत्नागिरीतल्या या समुद्राच्या पोटात गेल्यावर तिथलं विश्व पाहताना आपण हरवून जातो. याच स्कुबा डायव्हिंगमुळे सध्या रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.


स्वीमर्सचा गॉगल असल्यामुळे तोंडाने श्‍वास कसा घ्यावा, सोडावा याची माहिती दिली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रेस आणि ऑक्‍सिजनचा सिलिंडर दिला जातो. काही मिनिटे सराव करून घेतल्यानंतर डायव्हर्स समुद्रात उतरण्याची माहिती देतात. पाण्याखाली बोलता येत नाही... पण गाईड असणारे तुमचे डायव्हर्स खुणांनी तुन्हाला व्यवस्थित माहिती देतात.


स्कूबा डायव्हिंगच्या थरारासोबतच या मिरे समुद्रकिना-यावर डॉल्फिनची सफरही करता येणार आहे... डॉल्फिन माशांचे थवेच्या थवे  विहार करताना इथे पाहायला मिळतात...