आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत अनेक जण विनाकारण पुराच्या पाण्यात वाहने घालत स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र,  चंद्रपुरच्या एका मेडिकल ऑफिसरने स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धाडसाने रुग्णांना वेळेवर मिळाले उपचार मिळाले आहेत. त्यांनी भर पुरातून रुग्णांना ट्रॅक्टरने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. यात गर्भवती महिलांचा देखील समावेश होता (Chandrapur News).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यात गेले आठ दिवस अतिवृष्टी आणि पूरस्थिती कायम होती. या दरम्यान सामान्य वाटणाऱ्या नागरिकांनी असामान्य कामे केली. त्यातलेच घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी देखील नागरिकांच्या कौतुकाला पात्र ठरले. पूरग्रस्त भागातील गर्भवती महिला व कुपोषित बालकांच्या जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुरातून थेट ट्रॅक्टरवर वाहतूक करत रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करत अनोखी कामगिरी केली. 


जिल्हात पूरस्थिती निर्माण झाली. या पुराचा फटका रुग्णाना बसला. भर पूरस्थितीत प्रकृती खालावलेल्या रुग्णांना ट्रॅक्टरने भर पुरातून आरोग्य केंद्रात आणले गेले.यात गर्भवती महिलांचा समावेश होता.चंद्रपुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्हात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांच्या संपर्क तुटला. तर, काही गावांना पुराने वेढा दिला होता. या पुराचा वाहतूक, शेतीला मोठा फटका बसला. शेकडो घरांची पडझड झाली.या पुराचा फटका रुग्णांना बसला. 


वर्धा नदीला पूर आल्याने धानोरा पुलावरून पाणी वाहत होते. मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वढा गावाला पुराने वेढले होते. बेलसनी गावात सुद्धा पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरस्थितीत पिपरी व बेलसनी गावातील गर्भवती महिलांची प्रकृती खालावली.आरोग्य केंद्रातील आशा वर्कर, गावकरी यांच्या मदतीने त्यांना ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुराच्या पाण्यातून बाहेर काढत घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्या गेले. आरोग्य केंद्रात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


आरोग्य सेविकेच्या प्रसंगावधानाने गर्भवती आणि बाळाचे प्राण वाचले


गडचिरोली जिल्ह्यातील ताडगावमध्ये कंत्राटी आरोग्य सेविकेच्या प्रसंगावधानाने गर्भवती आणि बाळाचे प्राण वाचले. शेतात काम करताना राजे गावडे या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, तेव्हा प्राथमिक आरोग्य पथकातील सपना भुरसे या आरोग्य सेविकेनं तात्काळ राजेला खाटेवरून तब्बल एक ते दीड किलोमीटर दूर आरोग्य केंद्र गाठलं. त्यानंतर महिलेची सुखरुप प्रसुती झाली.