नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एकीकडे गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणारी पीडित महिला न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती पीडित महिलेच्या वकिलाने दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत अधिक माहिती देताना पीडित महिलेच्या वकिलांनी सांगितले की, गणेश नाईक यांची नवी मुंबई पोलिसांकडून कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे. आमच्यामार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले असून आमच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालाय. आता पुढे जाऊन आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत.


गणेश नाईक हे त्यावेळी मंत्री होते आणि महिलेवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे इच्छा नसताना 'त्या' नात्यात पीडित महिलेला भाग घ्यावा लागला.  मात्र, आता पोलिस काय कारवाई करतात याकडे आमची नजर आहे. आमचा लढा न्याय मिळवण्यासाठी असल्याची प्रतिक्रियाही वकिलांनी दिली.


त्या पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी आपल्याला राजकिय पाठिंबा भेटत आहे. या पाठिंब्याबद्दल वकिलांनी समाधान व्यक्त केलंय. आता गणेश नाईक यांच्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल केले आहेत. परंतु, त्या महिलेच्या मुलाला देखभाल खर्च, संपत्ती, व्यवसाय देण्यात यावा अशी मागणी कोर्टात करणार असल्याचेही वकिलांनी सांगितले.


तर, पीडित महिलेने आम्हाला न्याय भेटणार नसेल तर आम्ही कोर्टात जाणार याबद्दल आमदार गणेश नाईक यांना आधीच कल्पना दिली होती. गणेश नाईक यांच्या अटकेबाबत पोलिसांनी त्यांची कारवाई करावी. मात्र, मी माझ्या मुलाला न्याय देण्यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया दिली.