रत्नागिरी : नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत सध्या अनेक भाजप नेते उपस्थित आहे. उच्च न्यायालयाने तातडीने त्यांच्या जामीन अर्जावर नकार दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ज्यांनी नोटीस काढली ते अधिकारी अजून नाशिकमधून पोहोचलेले नाही. तरी देखील त्यांना अटक केली गेली. ते जेवत असताना त्यांना जबरदस्तीने धक्काबुक्की करुन अटक करण्यात आली. अटक कोणत्या कलमाखाली केली गेली ते देखील सांगण्यात आलं नाही, पोलिसांनी एका मंत्र्यांच्या दबावाखाली कारवाई केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. नारायण राणेंचा छळ करण्यासाठी त्यांना अटक केल्याचा आरोप देखील प्रसाद लाड यांनी केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. पण ही अटक कोणत्या कलमांअतर्गत झाली आहे. हे अजून स्पष्ट झालेलं नाही. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग समर्थकांनी रोखली आहे.


नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.