सांगली : मणेराजुरी येथे एक अजब प्रकार घडला आहे. महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल व ज्युनिअरल कॉलेजला धमकीचं एक पत्र आलं. आणि ही धमकी तुम्ही वाचाल तर चकित व्हाल.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेला आलेली धमकी अशी आहे की, हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील परीक्षा जर घेतल्या तर चक्क बॉम्बने उडवू अस सांगण्यात आलं. या धमकीमुळे शाळेतील शिक्षक आणि विश्वस्त चांगलेच हादरले आहेत. शाळेत सात बॉम्ब ठेवले आहेत, ते उडवू अशा आशयाचे निनावी पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळाल्याने मणेराजुरीसह परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून  मंगळवारी शाळा सोडून देण्यात आली. 


या पत्राची माहिती तासगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तासगाव पोलिसांनी, सांगलीच्या बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी शाळेमध्ये वाचन  परीक्षा घेण्यात येणार होती. त्या अगोदर इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या निखिल दिलीप कोरवी या विद्यार्थ्याने मुख्याधापक पी. आर. पाटील यांच्याकडे बंद पाकीटाचा लिफाफा दिला.  तो म्हणला की, हे पत्र मला अनोळखी व्यक्तीने दिले असून ते तुम्हास देण्यात सांगितले आहे. असे सांगून तो विद्यार्थी परीक्षेत बसण्यास गेला, मुख्याध्यापकांनी हे पत्र उघडून वाचले असता. त्यामध्ये असे लिहिले होते, की  इयत्ता ५वी, ६वी, ७वी,च्या कोणत्याही परीक्षा घेऊ नयेत जर तुम्ही तसे न केल्यास शाळेच्या आवारात सात बॉम्ब ठेवले असून ते कोणत्याही क्षणी उडविण्यात येतील अशी धमकी या पत्रात दिली होती.


त्यांनी तातडीने या घटनेची माहिती तासगाव पोलिसांनी दिली. तासगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल तनपूरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी पाहणी करून, सांगलीच्या बॉम्ब निकामी व श्वान पथकाला पाचारण करून संपूर्ण शाळेच्या परिसराची पिंजून काढला. हा खोडसाळपणा असलेचे लक्षात येताच, पोलिसांनी ज्याने ‘पत्र’ आणून दिले त्या सहावीच्या विद्यार्थ्यांची करून चौकशी केली, असता मला हे पत्र ‘शाळेत’ न दिल्यास ठार मारण्यात येईल असे सांगितल्यामुळे हे पत्र दिले असे स्पटीकरण दिले. 


 परंतु १२ वर्षाच्या या मुलाला जेव्हा पोलिसांनी दराडावून विचारले असता, त्याने चाचणी परीक्षेची भीती वाटत असल्याने या परीक्षाचाच होऊ नयेत यासाठी त्याच्याच वर्गातील मित्राच्या सहायाने हा उद्योग केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु या घटनेकडे या गांभीर्याने लक्ष देऊन याच्यामागे कोण आहे का? याचाही शोध घेऊ असे पोलिसांनी सांगितले.