पुणे : पुणे एटीएसच्या पथकांनं आज तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. या तिघांचा बांग्लादेशी संघटना अन्सार उल बांग्ला या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला आरोपी वानवडीतून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्याच्या चौकशीतून आणखी दोघांना आकुर्डीतून ताब्यात घेण्यात आलं. हे तिघं पाच वर्षांपासून पुण्यात राहत होते. 


या तिघांकडून मोबाईल, सिमकार्ड आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आलीय. या तिघांनी भारतात आल्यावर खोटी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र  तयार केली होती.