सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाचे (Coronavirus) संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन संपल्यामुळे काल रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन संपल्यामुळे मध्यरात्री रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच सकाळी सहा वाजेपर्यंत देखील त्या ठिकाणी एकही डॉक्टर हजर नव्हता, अशी तक्रार नातेवाईकांकडून आता करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने हॉस्पिटलच्या ठिकाणी रवाना झाले. मात्र हॉस्पिटल जवळ अर्धा तास पेक्षा जास्त वेळ थांबल्यानंतर सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीही माहिती तहसीलदारांना दिली नाही. तसेच डॉक्टरही तहसीलदारांना भेटलले नाहीत., त्यामुळे आता तहसीलदारांनी हॉस्पिटलला पत्र पाठवून माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले. या माहिती मिळाल्यानंतर मीडियाला याबाबतची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, ठाणे येथे धक्कादायक घटना घडली आहे. वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital) चार कोरोना (Coronavirus) रुग्णांचा मृत्यू झाल्याने तणावाची स्थिती झाला आहे. ऑक्सिजन ( oxygen ) न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत रुग्णालयाने  अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Four Covid Patients Death due to lack of oxygen in Vedant Hospital at Thane)


ठाण्यातील वर्तकनगर येथील खासगी कोविड या वेदांत रुगणालायत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असताना दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई आणि चौकशीची करण्याची मागणी केली आहे.  दरम्यानन, कोरोना (Coronavirus) रुग्णांपैकी अरुण शेलार (51), करुणा पाष्ठे (67), विजय पाटील (57),  दिनेश पाटणकर (41)  या चार जाणांचा मृत्यू झाला.