प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: आपल्या देशात आणि जगात अनेक प्रकारे प्राण्यांची कत्तल केली जाते. कधी कधी त्यांना फार वाईट पद्धतीनं मारहाणही केली जाते. परंतु सध्या जो प्रकार समोर आलाय तो ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. ही घटना कोल्हापूरला घडली असून सध्या या घटनेनं एकच खळबळ माजवून दिली आहे. हा प्रकार सध्या सगळीकडेच फारच निंदनीय म्हणून चर्चिला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हेल माश्याची उलटीची तस्करी करू पाहणाऱ्यांनी पोलिसांनी पकडलं आहे. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्‍या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी सरनोबत वाडी येथे सापळा रचत अटक केलीय. त्याच्याकडून कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. व्हेल माशाची उलटी काही जण विक्रीसाठी घेवून येत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळी तपास पथके तयार करून या युवकाचा शोध सुरू केला. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


कसा रचला त्यांनी हा सापळा? 


त्यावेळी गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक फौजदार श्रीकांत मोहिते व पोलीस कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारमार्फत व्हेल माशाची उलटी बेकायदा जवळ बाळगून ती विक्रीसाठी पुणे - बेंगलोर महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी पुणे- बेंगलोर महामार्गावर सरनोबतवाडी येथील सर्व्हिस रोडवर सापळा लावला. 


viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!


अबब! इतकी महागडी उलटी...


यावेळी हुंडाई एसेंट कार रोखून तपास केला त्यावेळी गाडी मध्ये 3 कोटी 41 लाख 30 हजारांची व्हेल माशाची उलटी मिळून आली. पोलिसांनी संशयित आरोपी प्रदीप भालेराव, संशयित आरोपी शकील शेख आणि संशयित आरोपी आमीर पठाण यांना ताब्यात घेण्यात आलं. या तिघांच्या टोळीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत.