कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, जवळपास 10 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक खोळबंळली होती (Nashik Accident News). 


नेमका कसा घडला अपघात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक-पुणे महामार्गावरून विठ्ठल नामाचा आणि साईनाथाचे नामस्मरण करत शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांच्या दिंडीत भरधाव वेगाने कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार वारकरी जागीच ठार झाले आहेत. तर, नऊ ते दहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. 


ड्रायव्हरने मद्यपान केल्याने झाला अपघात


या अपघाताला कारणीभूत असणारा ट्रक क्रमांक MH 12 VT 1455 वरील चालक मद्यपान करुन वाहन चालवत होता.  त्यातच त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी प्राथमिक माहिती दिली. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटली नाही. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी होती, सदर दिंडी ही आळंदी देवाची येथे जात होती.


पाणीपुरीच्या ठेल्याला भरधाव वेगात येणा-या क्रेनने चिरडलं


गोंदियाच्या आमगाव-सालेकसा मार्गावर पानगावमध्ये पाणीपुरीच्या ठेल्याला भरधाव वेगात येणा-या क्रेनने चिरडलंय. पाणीपुरी विक्रीसाठी घेवून जात असताना मागून येणा-या क्रेनने धडक दिली. या अपघातात पाणीपुरीवाल्याचा जागीच मृत्यू झालाय.