सांगली : एसटी बस आणि डंपरच्या भीषण अपघातात ३ जण ठार तर चारजण जखमी झालेत. विटा रेवणगाव घाटातल्या धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा अपघात 12 वाजण्याच्या सुमारास घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, विजय जालिंदर कुंभार (वय 46), तानाजी विलास जाधव (वय47 रा. भडकेवाडी) आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता.संगोला) अशी मृतांची नावे आहेत. तर, सत्वशीला श्रीरंग धाने, दत्तू सुनील धाने (रा,धानेवाडी) आणि साई सुनील धाने अशी जखमींची नावे आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य हाती घेतले. याच नागरिकांनी पोलिसांनाही घटनेची माहिती दिली.