अष्टापूर येथे कार विहिरीत पडून तीन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे कार विहिरीत पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर.
हेमंत चापुडे / पुणे : जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे कार विहिरीत पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशीरा अष्टापूर येथे हा अपघात झाला. सचिन कोतवाल हे आपल्या कुटुंबीयांसमोर कारने प्रवास करीत होते. सचिन कोतवाल यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अष्टापूर येथील सचिन कोतवाल हे पत्नी आणि दोन मुलासह कारमधून जात होते. यावेळी गाडी थेट विहीरीत पडल्याने पत्नी आणि दोन मुलांना यात जीव गमवावा लागला.अपघात पत्नी शितल कोतवाल, मुलगी सृष्टी आणि मुलगा शौर्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सचिन कोतवाल यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.