चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...
Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चायनीज देण्याच्या अमिषाने एका दहा वर्षांच्या चिमुकलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. शाळेत गुड टच बॅड टच शिकवत असताना या घटनेचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात तिन आरोपींविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्टपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. मात्र, नराधमांनी तिला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळं मुलीने कोणालाच याबाबत सांगितलं नाही. एकदा शाळेत मुलींना गुड टच आणि बॅड टचबद्दल सांगण्यात येत होते. तेव्हाच पीडित मुलगी वर्गात रडू लागली. शिक्षिकेने मुलीला रडण्याचे कारण विचारले तेव्हा सुरुवातीला तिने सांगण्यास नकार दिला.
शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन काय घडलं ते विचारलं. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर शिक्षिकेने मुलीच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी तिनही आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित तरुणीला चायजीजचे आमीष दाखवले होते. मुलीला आमिष दाखवत तिच्याच घरी नेले आणि आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. तसंच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आरोपींमध्ये बाप-लेक आणि चायनीजचा गाडा चालवणारा एक जण अशा तिघांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, बीडच्या गेवराई जिल्ह्यात आणखी एक घटना घडली आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर दोघांनी अत्याचार केला आहे. तसंच, पीडित महिला आणि सासूला मारहाण केली आहे. शेतातील बांधावर जनावरांना गवत आणण्यासाठी गेलेल्या दोन जण महिलेशी लगट करण्यास सुरुवात केली. त्यानंतक एकाने पाठीमागून तिचे डोळे बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती तिने कुटुंबीयांना सांगताच आरोपीने तिच्या सासूला मारहाण केली