पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह राहणाऱ्या बीडच्या तिघांवर आरोग्य विभागाची नजर
दुबईहून एकत्र फिरून आले होते हे नागरिक
बीड : पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. एवढंच नव्हे तर या रूग्णांनी मुंबई-पुणे प्रवास ज्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत केला त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासह बीडच्या तिघांनी देखील दुबई प्रवास केला होता. या तिघांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.
या तिघांना अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही. पण तरीही खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाची देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 दिवसांपर्यंत कोरोनाची लागण होण्याची भीती असते. भारतात आल्यावर दहा दिवस लोटले आहेत. अजून अठरा दिवस आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून राहणार आहेत. (पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर)
जर या तिघांना कोरोनाची लागण झाली तर तातडीने त्यांच्यावर उपचार केले जातील. यामुळे या तिघांवर आरोग्य विभागाची नजर आहे. दुबईला 40 जणांचा ग्रुप खासगी टूरिस्ट कंपनीसोबत दुबईला गेले होते. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत दुबईचं नाव नव्हतं. यामुळे ही टूर करण्यात आली. आणि मुंबई-पुण्यात कोरोना हा दुबईतून आला आहे.
पुण्यातील या दाम्पत्यासह त्यांच्या मुलीचा आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या पाचही जणांना नायडू रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहे. तसेच या तीन व्यक्तींनी आतापर्यंत कुणाकुणाशी संपर्क साधला त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाने मुंबई आणि पुण्यात प्रवेश केला आहे. आता नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घ्यायला हवी.