Badlapur Crime News : बदलापूरात तरुणावर प्राण घातक हल्ला झाला आहे.  गॅंग मध्ये सामील होत नसल्याने  बदलापूरात तरुणावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे.  तलवार आणि चॉपरने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहन पाठक असे जखमी तरुणाचे नाव आहे. रोहन हा आपल्या मित्राला सोडण्यासाठी दुचाकीवरून गणेश नगर भागातून जात असताना 7 जणांच्या टोळीने त्याच्यावर तलवारी आणि चॉपरने हल्ला केला. यात रोहन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रोहन याला आपल्या गॅंग मध्ये सहभागी हो असं या टोळीतील सदस्याने सांगितलं मात्र रोहने त्यास नकार दिला त्यामुळे त्याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा रोहनच म्हणणे आहे. हल्ला करणारे सातही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. 


ज्यूस घेण्याच्या वादातून तुफान राडा 


ज्यूस घेण्याच्या वादातून तुफान राडा झाल्याची घटना उल्हासनगर घडली आहे. या राड्यात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे,
मध्यरात्री पंजाबी कॉलनी परिसरात राहणारे दीपेश वाघेला हा तरुण मित्रांसोबत ज्यूस घेण्यासाठी गोलमैदान परिसरात असलेल्या ज्यूस सेन्टर वर गेला होता. परंतु ज्यूस देण्यास उशीर झाल्याने दीपेश आणि ज्यूस सेन्टरच्या मालकामध्ये वाद निर्माण झाले. याच वादातून थेट दगडफेक आणि नंतर लोखंडी रॉड ने हल्लाही झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या हल्ल्यात दीपेश वाघेला याला लोखंडी रॉड ने बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाला असून सद्या त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  परंतु अद्याप पर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचं वाघेला याचं म्हणणं आहे. सदर ज्यूस सेन्टर हे मध्यरात्री पर्यंत सुरू असल्याने याठिकाणी कायदा अस्तित्वात नाही का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


अंबरनाथमध्ये चोरट्याने एकाच रात्री दोन दुकानं फोडली


अंबरनाथमध्ये एकाच रात्री चोरट्याने दोन दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात  कैद झाली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील वर्धमान नगर परिसरात दीपक जयस्वाल यांच ऑल इन वन नावाचं मेडिकल दुकान आहे,या दुकानात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरचा लॉक तोडून आत मध्ये प्रवेश केला,त्यानंतर दुकानात असलेल्या टेबलचा ड्रॉव्हर उचकटून त्यातले 50 हजार रुपये घेऊन पसार झाले . नंतर चोरट्याने दीपक यांच्या मेडिकलच्या बाजूला असलेल्या विघ्नहर डेरी अँड ड्रायफूट या दुकानात शिरून दुकानातील 15 हजार रोख रक्कम चोरी करून चोरटे फरार झाले, दोन्ही दुकानून चोरट्याने तब्बल 65 हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेली आहे, चोरीची संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे,याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आता या चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. तसेच या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.