COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर : एखाद्या अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पात तुम्ही पर्यटक म्हणून गेलात, आणि तुमच्या समोर वाघांची झुंज झाली तर, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओज आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका पर्यटक जिप्सीपुढे असाच बाका प्रसंग ओढवला. त्यांना जो काही थरार अनुभवायला मिळाला तो शब्दांच्या पलीकडला होता.


संरक्षित वनात किंवा गावालगतच्या जंगलात एखादा वन्यजीव अचानक समोर येणं वनव्याप्त क्षेत्रात वास्त्यव्याला असलेल्या नागरिकांसाठी सामान्य गोष्ट आहे. मात्र जंगल अनुभवण्यासाठी तुम्ही एखाद्या अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पात सहकुटुंब गेलात आणि तुमच्या समोर वाघांची झुंज झाली तर असाच काहीसा प्रसंग चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


फेसबुकच्या माध्यमातून ही दृष्य व्हायरल झाली आहेत. लहान मुलांचा समावेश असलेल्या या पर्यटक जिप्सीच्या थेट पुढे दोन वाघोबांची झुंज झाली. ही लढत होती  केवळ १० सेकंदाची, मात्र 'जंगल का कानून' ची आठवण करून देणारी.


काही वेळाने वाघोबा थंडावले आणि आपल्या वाटेला लागले. मात्र पर्यटक जिप्सीनी वाघोबाच्या जवळ जाणे किती घातक आहे. हा प्रसंग हे ठळकपणे सांगून गेला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिका-यांनी असा प्रसंग ओढवू शकतो. पर्यटकांनी वन्यजीव समोर असताना पाळावयाचे किमान नियम कसोशीने पाळले पाहिजेत यावर भर दिला आहे. 


पर्यटकांनी वाघाच्या समोर असताना अधिक हालचाल न करणे, कॅमेरा किंवा मोबाईल फ्लॅशचा वापर न करणे यासह सुरक्षित अंतर ठेवणे, हातवारे न करता नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे या दृष्यांनी स्पष्ट केलंय. पर्यटकांनी हे नियम पाळणं खरोखरंच गरजेचं आहे.