प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : शिर्डीमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाच मित्र एका हॉ़टेलमध्ये गेले. टिकटॉक व्हिडीओ तयार करण्याची खटपट सुरू झाली. पण पुढे भलतंच घडलं. टिकटॉक व्हिडीओ हा जीवघेणा ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतीक वाडेकर आता या जगात नाही. त्याच्या मृत्यूला कारण ठरला तो टिकटॉकचा व्हिडीओ तयार करण्याचा नाद. हॉटेल पावन धाममधल्या खोली क्रमांक १०४ मध्ये हा भयानक प्रकार घडला. प्रतिक वाडेकर, त्याच्या चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी शिर्डीत आला होता. हॉटेलमध्ये सगळे मित्र टिकटॉक व्हिडिओ तयार करत होते.. त्यावेळी सनी पवार याच्या हातातल्या गावठी कट्यातून गोळी सुटली आणि ती प्रतीकच्या छातीत घुसली. यामध्ये प्रतीकचा जागेवरच मृत्यू झाला.


या मित्रांकडे गावठी कट्टे आले कुठून, याचा तपास सुरू आहे. टिकटॉकच्या नादात गुन्हेगारी वाढते आहे. तरुणाई यातून बाहेर पडत नाही. टिकटॉकचा हा भलता नाद जीवघेणा ठरतो आहे.